Section Title

Main Content Link

भारतातील वर्ग I शहरांमधील घन कचरा व्यवस्थापनाच्या आधुनिकीकरणासाठी शिफारशी
माननीय भारतीय सर्वोच्च न्यायालायाद्वारा गठित (मार्च, 1999) समितीचा अहवालाद्वारा

स्रोताकडेच कचऱ्याचा संचय

कोणताही कचरा रस्त्यांवर, पादचारी मार्गावर, खुल्या जागेत, गटारीत किंवा जलाशयांमध्ये फेकण्यात येऊ नये. स्रोताच्या जागीच कचऱ्याला दोन पिशव्यांमध्ये जमा करून ठेवावे, ज्यात एक अन्नपदार्थाचा कचरा/जैवअपघटनीय कचऱ्यासाठी असतो आणि दुसरा पुनर्चक्रीकरण करता येण्याजोग्या कचऱ्यासाठी, म्हणजेच कागद, प्लास्टिक, धातू, काच, चिंध्या आदी असतील. (जोडपत्र ‘अ’ आणि ‘ब’ पहा)बॅटरीज, रसायन आणि कीटकनाशकांचे डबे, काढून टाकलेली औषधे आणि अन्य घरगुती विषारी आणि घातक कचरा, जेव्हा पण निघतो किंवा बनतो, तेव्हा त्याला वरील दोन मार्गे वेगवेगळे ठेवावे.

पुनर्चक्रीकरण करता येण्याजोग्या कचऱ्याला वेगळे करणे

स्थानिक संस्थांनी थेट घरांना, दुकानांना आणि आस्थापनांना घरगुती खाद्यपदार्थ/जैवअपघटनीय कचऱ्याना पुनर्चक्रीकरण करता येण्याजोग्या कचऱ्यासोबत न ठेवण्याचे आणि त्याऐवजी पुनर्चक्रीकरण करता येण्याजोग्या कचऱ्यास/जैवअपघटनीय नसणाऱ्या कचऱ्यास ते बनण्याच्या स्रोताकडेच वेगवेगळ्या कचरापेटीत किंवा पिशव्यांमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले पाहिजेत.

कचऱ्याचा प्राथमिक संग्रह

घरगुती, व्यापारी आणि संस्थागत खाद्यपदार्थाचा/जैवअपघटनीय कचऱ्यास दारातूनच किंवा सामुदायिक कचरापेटीतून रोजच्या रोज गोळा करण्यात यावे. विषारी आणि घातक कचऱ्याच्या व्यतिरिक्त पुनर्चक्रीकरण करता येण्याजोगा कचरा/जैवअपघटनीय नसलेल्या कचऱ्याला निर्मितीच्या स्रोताकडूनच वारंवार आणि वेळोवेळी स्थानिक संस्थाद्वारा अधिसूचित केल्यानुसार गोळा करण्यात यावे. जोडपत्र ‘ब’ मध्ये दर्शविलेला घरगुती घातक/विषारी कचरा, तो कचरा निर्माण करणाऱ्यांनी विशेष कचरा पेट्यांमध्ये जमा करावा, ज्या स्थानिक संस्थांद्वारा अशा कचऱ्याला जमा करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या असतात

रस्ते आणि सार्वजनिक स्थळांवरील कचरा काढणे

सर्व सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि उप-गल्ल्या ज्यावर वस्ती असेल किंवा व्यापारी कार्ये चालत असतील, त्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना रोज सफाई केली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक झाडूवाल्याला स्पष्टपणे जागा आखून दिली पाहिजे आणि रस्त्यावरील कचरा त्या शहरात तात्पुरत्या कचरा संग्रहणासाठी ठेवलेल्या डब्यात जमा करून ठेवण्यात यावा.

कचरा कुंड्यांची तरतूद

रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजारपेठांची स्थाने, उद्याने आणि बागांमध्ये, आणि महत्त्वाच्या व्यापारी स्थानांवर पुरेशा संख्येत कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या पाहिजेत, जेनेमरून रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्याचे टाळले जाईल.

कचऱ्याच्या नंतरच्या वाहतुकीसाठी तात्पुरते कचरा संचय डेपो.

सर्व खुले कचरा संचय डेपो लवकरात लवकर बंद करावे आणि सिमेंट पाईप्स, धातूच्या रिंगच्या, बांधकामाच्या आदी सर्व कचरा पेट्या देखील योजनाबद्ध पद्धतीने एका तात्पुरत्या संचय सुविधेद्वारा एका व्यवस्थितरीत्या बंद केलेल्या चलित वाहनाच्या स्वरुपात बदलावेत. कचरा दारातून उचलण्यासाठी आणि / समुदायील कचराकुंड्यांमधून कमी खर्चात पुढील वाहतुकीसाठी हात गाड्या/कंटेनर असलेली तीनचाकी सायकल्स आदी. यांच्याद्वारा तात्पुरत्या संचयासाठी मोठे कंटेनर, किंवा एखादे थांबविलेले वाहन..

कचऱ्याची वाहतूक

कंटेनर्स/ट्रॉलीज आणि कचराकुंड्यांची स्थळे भरून वाहण्यापूर्वी कंटेनर्स कचऱ्याची वाहतूक नियमित केली जावी. त्याच्या अनुसार वारंवारता ठरविली जाऊ शकते. कचऱ्याच्या वाहतूकीची व्यवस्था आणि अशा तात्पुरत्या कचरा संचयाकडील राशीमाल संचयाचा ताळमेळ बसवायला हवा. फार लोकांद्वारे आणि हातांनी कचऱ्याची हाताळणी टाळली पाहिजे.

शिफारस केलेली प्रक्रिया आणि विल्हेवाटीचे पर्याय

घरांमधून, दुकानांमधून, बाजारातून, हॉटेल्समधून आणि अन्य आस्थापनांमधून गोळा केलेल्या सर्व सेंद्रिय/जैवअपघटनीय कचऱ्याला योग्य वाटेल अशा प्रकारे विजेसहित किंवा विजेविना कंपोस्ट खात बनविण्याच्या उपयुक्त पद्धतीचे पालन केले पाहिजे. केवळ नाकारलेले आणि घरगुती घातक कचरा काळजीपूर्वक भराव क्षेत्रात टाकला पाहिजे. जैव वैद्यकीय कचऱ्याचा निपटारा जैव वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, 1998 नुसार केला पाहिजे.

संस्थागत आशय आणि क्षमतेची उभारणी

व्यावसायिक लोक, प्रशासनाचे विकेंद्रीकरण, अधिकार देऊन, मानवी संसाधनांचा विकास, खाजगी क्षेत्र आणि एनजीओच्या सहभागाद्वारा संस्थागत मजबुतीकरणासाठी स्थानिक संस्था पुरेशा उपाययोजना करेल.

जोडपत्र: ए

खाद्यपदार्थाचा कचरा आणि जैवअपघटनीय कचरा यांच्यासाठी बनविलेल्या कचराकुंड्यांमध्ये टाकावयाच्या कचऱ्याचे प्रकार.

  • सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांचा कचरा, शिजविलेला आणि न शिजविलेला, ज्यात अंड्याची कवचे आणि हाडे असतील.
  • फळांच्या रसांची साले आणि घरातील झाडांचा कचरा यांच्यासहित फुले आणि फळांचा कचरा.
  • घरात काढलेला केरकचरा (बागेत किंवा अंगणात काढलेला कचरा नव्हे : जागेवरच निपटारा करा)
  • सॅनिटरी टॉवेल्स
  • विल्हेवाट लावायचे डायपर्स आणि असंयमी पॅड्स
  • राख

जोडपत्र: ब

अनौपचारिक क्षेत्राद्वारा संग्रहणासाठी ठेवण्यात येणाऱ्या पुनर्चक्रीकरण करण्याजोग्या कचऱ्याचे प्रकार

  • कागद आणि प्लास्टिक, सर्व प्रकारचे
  • कार्डबोर्ड आणि कार्टन्स
  • घातक पदार्थ नसलेले सोडून अन्य सर्व डबे
  • सर्व प्रकारचे पॅकेजिंग
  • सर्व प्रकारच्या काचा
  • सर्व प्रकारचे धातू
  • चिंध्या, रबर आणि लाकूड
  • धातूचे पातळ पत्रे, वेष्टने, लहान पिशव्या, सॅशे आणि टेट्रा पॅक्स (धुतलेले)
  • कॅसेट्स, कॉम्प्युटर डिस्क्स, प्रिंटर कार्ट्रिएजीस आणि इलेक्ट्रॉनिक भाग
  • निष्कासित कपडे, लाकूडसामान आणि उपकरणे