Section Title

Main Content Link

ई-कचरा व्यवस्थापनावर तज्ञ समूहाच्या गठनासाठी कार्यालयीन आदेश

ई-कचरा व्यवस्थापन

प्रस्तावना:

मुंबई भारताची एक आर्थिक राजधानी आणि सर्वात मोठे बंदर देखील आहे. मुंबई आणि पुणे प्रांतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी) उद्योगात अत्यंत वेगात वृद्धी झाली आहे. त्याशिवाय मुंबई आणि पुण्याच्या सभोवतालच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या संख्येत अन्य इलेक्ट्रॉनिक आणि उपभोक्ता टिकाऊ वस्तूंच्या उत्पादकांची संख्या वाढली आहे. या भागातील बंदरे देखील देशात विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरत आहेत. या उपक्रमांच्या परिणामी या भागात आणि तसेच नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि अन्य जलद वाढणाऱ्या शहरांमध्ये देखील अशी कार्ये आणि इलेक्ट्रॉनिक आणि उपभोक्ता टिकाऊ वस्तूंच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, परिणामी महाराष्ट्रात आणि खास करून मुंबई आणि पुण्यात, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल ई-कचऱ्याच्या निर्मितीत वाढ झाली आहे. सध्या या ई-कचऱ्याला हाताळण्यासाठी कोणतीही नियमने नाही आहेत किंवा विविध स्रोतांमधून निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याच्या संग्रहणासाठी, अभिक्रियेसाठी, पुनर्चक्रीकरणासाठी, पुनर्वापरासाठी आणि अंतिम विल्हेवाटीसाठी कोणतेही शास्त्रीयरीत्या रचलेल्या ई-कचरा सुविधा नाही आहेत. एमपीसीबीने अगोदरच या बाबींवर नजर टाकली आहे आणि पर्यावरणात्मकदृष्ट्या अनुरूप पद्धतीने या ई-कचऱ्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल ईएमपीए (स्वित्झर्लंड), जीटीझेड आणि एईएसएमसारख्या एजन्सीजबरोबर चर्चा सुरु केल्या आहेत. एमपीसीबीने यापुढे मुंबई आणि पुणे भागात ई-कचऱ्याच्या निर्मितीच्या जलद मूल्यांकनावरील पथदर्शी अभ्यासाला सुरु करण्याचे असे ठरविले आहे आणि यासाठी यूएनईपीने एमपीसीबीद्वारा प्रस्तावित अभ्यासात आपली इच्छा देखील दर्शविली आहे. या प्रकरणी आणखी चर्चा करण्यासाठी, एमपीसीबीने मे 2005 आणि संप्टेंबर 2005 मध्ये अनुक्रमे ईएमपीए आणि यूएनईपीच्या तज्ञांशी बैठकी केल्या. एमपीसीबीने प्रस्तावित अभ्यासाच्या संदर्भांच्या अटींचा मसुदा बनविला आहे. एमपीसीबीने 22.09.2005 रोजी ई-कचऱ्यावरील तज्ञ आणि माहिती तंत्रज्ञानाच्या उद्योग आणि उत्पादक संघटना आणि संशोधन संस्था यांच्यासह बैठकी आयोजित केल्या होत्या.

आदेश:

महाराष्ट्रातील ई-कचरा व्यवस्थापनासाठी नियमने बनविण्यासाठी आणि प्रस्तावित अभ्यासाला मार्गदर्शन करण्यासाठी एक तज्ञ समूह गठीत करण्याचे वर उल्लेखित बैठकीत ठरविण्यात आले असल्यामुळे, एमपीसीबीने खालील तज्ञ आणि एनजीओज यांनी बनलेल्या एका समुहाचे गठन केले:
1) डॉ. डी.बी. बोराळकर, सदस्य सचिव, एमपीसीबी

2) श्री विन्नी मेहता, अध्यक्ष, एमएआयटी, नवी दिल्ली – सदस्य 3)

श्री किशोर वानखेडे, टॉक्सिक लिंक्स, मुंबई - सदस्य 4)

श्री बी.के. सोनी, एम.डी. इन्फोट्रेक सिस्कॉम लि. – सदस्य 5)

श्री मार्कंडेय, मुख्य इंजिनियर, (एसडब्ल्यू). एमसीजीएम, मुंबई – सदस्य

6) सीपीसीबीमधून एक प्रतिनिधी, दिल्ली – सदस्य

7) डॉ. राकेश कुमार, उप संचालक, एनईईआरआय, मुंबई – सदस्य

8) डॉ. व्ही. के. शर्मा, प्रोफ. आयजीआयडीआर, मुंबई – सदस्य

9) श्री संदीप टंडन, मुंबई – सदस्य

10 कु. ललिता वैद्यनाथन, पी.टी,आय. – सदस्य

11) कु. निधी झमवाल, सीएसई, नवी दिल्ली – सदस्य

12) कु. दिपाली खेत्रीवाल, प्रतिनिधी, ईएमपीए – सदस्य

13) श्री पी. वेणुगोपाल, संचालक, एसटीपीआय, नवी मुंबई – सदस्य

14) यूएनईपीमधून एक प्रतिनिधी, दिल्ली – सदस्य

16) डॉ. अजय देशपांडे, आर.ओ. आय/सी, पीसीआय-II, एमपीसीबी – आयोजक

 
तज्ञ समूहांच्या संदर्भांच्या अटी (टीओआर) खालीलप्रमाणे आहेत:

  • अभ्यासासाठी प्रोटोकॉल्सन अंतिम स्वरूप देणे आणि अभ्यासाच्या खर्चाच्या घटकाचे मुल्यांकन करणे
  • डब्ल्यूईईईमध्ये पुनर्चक्रणासाठी आणि संग्रहण यंत्रणेसाठी सुविधा स्थापित करण्यासाठी आवश्यक अशा स्थानिक राज्य सरकारच्या विधिविधानाच्या आवश्यकतेचा अभ्यास.
  • ई-कचरा मुल्यांकन अभ्यासाच्या प्रगतीचे संनिरीक्षण करणे.
  • महाराष्ट्रातील ई-कचऱ्यासाठी पुनर्चक्रण सुविधेच्या विकासाशी संबंधित प्रकरणांचे परीक्षण करणे.
  • योग्य संस्थेच्या मदतीने खाजगी भागीदार प्रकल्पासाठी (पीपीपी) विकसित करणे
  • वरील ध्येयाच्या पूर्तीसाठी समिती जेवढ्या वेळा आवश्यक असेल तेवढ्या वेळा बैठक करेल.
  • तज्ञ समूहाच्या खाजगी सदस्यांना नियमांनुसार टीए/डीए आणि मानधन दिले जाईल .

हा आदेश तत्काळ रूपाने लागू होईल

 
 
(डी. बी. बोराळकर)
सदस्य सचिव

प्रत


प्रत सदस्य सचिव, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण समिती, परिवेश भवन, इस्ट अर्जुन नगर, नवी दिल्ली- 110032 यांना सादर करण्यात आली – वरील समितीसाठी तुमच्या प्रतिनिधीला नामांकित करण्याची विनंती करण्यात येत आहे.

Copy to:
1) श्री विन्नी मेहता, अध्यक्ष, एमएआयटी, नवी दिल्ली

2) श्री किशोर वानखेडे, टॉक्सिक लिंक्स, मुंबई

3) श्री बी.के. सोनी, एम.डी. इन्फोट्रेक सिस्कॉम लि.

4) श्री मार्कंडेय, मुख्य इंजिनियर, (एसडब्ल्यू). एमसीजीएम, मुंबई

5) सीपीसीबीमधून एक प्रतिनिधी, दिल्ली

6) डॉ. राकेश कुमार, उप संचालक, एनईईआरआय, मुंबई

7) डॉ. व्ही. के. शर्मा, प्रोफ. आयजीआयडीआर, मुंबई

8) श्री संदीप टंडन, मुंबई

9) कु. ललिता वैद्यनाथन, पी.टी,आय.,

10) कु. निधी झमवाल, सीएसई, नवी दिल्ली

11) कु. दिपाली खेत्रीवाल, प्रतिनिधी, ईएमपीए

12) श्री पी. वेणुगोपाल, संचालक, एसटीपीआय, नवी मुंबई

13) यूएनईपीमधून एक प्रतिनिधी, दिल्ली

प्रत:
सदस्य सचिव, एमपीसीबी, मुंबई.