Section Title

Main Content Link

22.09.2005 रोजी झालेल्या सभेचे कार्यवृत्त

ई-कचरा व्यवस्थापन

22 सप्टेंबर 2005 रोजी एमपीसीबी येथे झालेल्या सभेचे कार्यवृत्त

 
अध्यक्ष    डॉ. डी. बी बोराळकर, सदस्य सचिव (एमपीसीबी)
     
वक्ते    

  • डॉ. डी. बी. बोराळकर, एमपीसीबी
  • श्री बास डे लिऊ आणि श्री वू अंह तुआन, यूएनईपी, पॅरिस
  • श्री रॉल्फ विड्मेर, ईएमपीए, सेट गॅलेन
  • श्री रजनीश सरीन, आयआरजी, दिल्ली
  • श्री विन्नी मेहता, एमएआयटी, दिल्ली

सहभागी: यादी जोडली आहे


     
आरंभी डॉ. बोराळकर यांच्याद्वारा स्वागतपर भाषण

 
डॉ. बोराळकर: महाराष्ट्रातील ई-कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून प्रस्तुती

  • दारासमोर असलेली ई-कचऱ्याची समस्या आणि ईसी निर्देशांच्या अनुसार, घातक ई-कचऱ्याचे 12 गट, ई-कचरा योग्य रीतीने संग्रहण करण्यासाठी आणि पुनर्चक्रण करण्यासाठी एक यंत्रणा रचण्यासाठी ही योग्य वेळ आहे.
  • स्वतःहून त्या वस्तू घातक नसतील, पण त्याच्या अंतिम वापरानंतर आणि जर योग्य रीतीने हाताळले नाहीत तर, ते घातक बनू शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी योग्य अभिक्रिया महत्त्वाची ठरते. मुख्यत्त्वे अशा घटकांमध्ये, ज्यात शिसे, कॅडमियम, ब्रोमिनेटेड फ्लेम रिटार्डंट्स, सीआरटी आदी असतात.
  • ई-कचऱ्याचे भारतात आणि अन्य दक्षिण पूर्व देशांमध्ये पुनर्चक्रण होते, जे कामगारांना आणि पर्यावरणास घातक ठरते. उदा. सीआरटी तोडल्याने कापले जाण्यासारख्या इजा होतात, जड धातू काढण्यासाठी आम्लाचा वापर केला जातो आणि तुकडे करणे, जाळणे आदी श्वसनाच्या समस्या निर्माण करतात.
  • भारतातील दृश्य – पीसीचा अपेक्षित वृद्धी दर 60-70% आहे (एमएआयटी डेटाच्या अनुसार). उत्पादन क्षमता वर्ष 1991 मधील 20,000 पेक्षा कमीपासून आता 1 दशलक्षवर गेली आहे.
  • प्रदूषणाच्या समस्या अशुद्ध प्रक्रियांचा वापर करत घरामागील स्मेल्टिंग प्रक्रियेशी संबंधित असतात, ज्यांच्यासाठी होणारी त्यात होणारी उत्सर्जने आणि जड धातूचा धातुमळी जबाबदार असतो.
  • इंडिया, चीन, पाकिस्तानवरील बीएएन (बेझल अॅक्शन नेटवर्क) आणि टॉक्सिक्स लिंकद्वारा केल्या गेलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की प्रगत देशांमधून मोठ्या प्रमाणावर ई-कचऱ्याची आयात खर्च आणि मर्यादित क्षमतेमुळे होत आहे. ई-कचऱ्याच्या आयातीवरील निर्बंधांनंतर देखील मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते आणि अशुद्ध तंत्रांचा वापर करत पुनर्चक्रीकरण केले जाते.
  • भारतात, घटक कचरा नियमावली, 1989 च्या अनुसार, उच्च संहितेचे निश्चित असे पदार्थ असल्याशिवाय ई-कचऱ्याचा समावेश केला गेला नव्हता. पीसीबीज आणि सीआरटी नेहमीच अशा मापदंडाची सीमा ओलांडतात, त्यामुळे अशी अनेक संशयास्पद क्षेत्रे आहेत, ज्यांना संबोधणे आवश्यक आहे. ऑस्ट्रियामध्ये व्याख्या स्पष्ट आहे. बेझाल कन्वेन्शनमध्ये ए1180 मध्ये डब्ल्यूईईई असेम्ब्लीज आहेत आणि बी1110 मध्ये मिरर एन्ट्री आहेत, मुख्यत्त्वाने पार, शिसे आणि कॅडमियम यांच्याविषयी चिंता आहे.
  • मुंबई महानगरपालिका अगोदरपासूनच एका शास्त्रीय पद्धतीने गोळा करण्यासाठी आणि विल्हेवाट लावण्यासाठी घन कचरा व्यवस्थापन सुधारण्याच्या प्रक्रियेत आहे
  • एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) कचरा व्यवस्थापन मुलभूत संरचनेत गुंतवणुकीसाठी सवलत देते >> जमीन आणि सवलत
  • एमपीसीबी अशा सुविधांसाठी 5% भांडवली सवलत देण्यासाठी समर्पित आहे.
  • मुंबई प्रांतात एक जलद मुल्यांकन करण्याचा एमपीसीबीचा निर्णय आहे. स्थानिक भागीदार म्हणून आयआरजी+एफईई अभ्यास आयोजित करणार आहेत. टॉक्सिक्स लिंक पारदर्शिता आणण्यासाठी समाविष्ट होणार आहे. एमएआयटी उद्योगाला दृष्टीकोन उपलब्ध करण्यासाठी सामील झाला आहे. यूएनईपीने रुची दाखविली आहे आणि या अभ्यासात सहाय्य करण्याची इच्छा दाखविली आहे. ईएमपीए आणि सीपीसीबी+एएसईएम देखील तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शन देणार आहेत.

 
बास डे लिऊ आणि वू अंह तावून, यूएनईपी: भारतातील पर्यावरण आणि ई-कचरा

  • यूएनईपी एका विस्तृत अशा 10 वर्षांच्या चौकटीत असणारा, चिरस्थायी वापर आणि उत्पादन यांच्यावरील एक अग्रगण्य जागतिक कार्यक्रम आहे, जो या सोडून दिलेल्या समाजापासून एका अधिक सोयीस्कर जीवन चक्र पद्धतीकडे नेण्यासाठी सर्व सरकारे आणि प्रांतांसह काम करीत आहे.
  • ई-कचरामध्ये पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक आव्हाने आहेत. ई-कचरा प्रकल्पासाठी यूएनईपी अगोदरपासून सक्रीय असलेल्या समुदायांसह काम करणार आहे, प्रात्यक्षिक प्रकल्पांपासून धडे घेऊन आशियातील, भारतातील आदी अन्य शहरांकडे घेऊन जात आहे.
  • ई-कचऱ्याच्या अयोग्य पुनर्चक्रीकरणामुळे होणाऱ्या पर्यावरणीय आणि स्वास्थ्याच्या प्रभावास कमी करणे, उत्पन्न निर्माण करण्याच्या संधी वाढविणे, खास करून अनौपचारिक पुनर्चक्रण क्षेत्रामध्ये.
  • उद्दिष्टांचे 3 स्तर: स्थानिक, राष्ट्रीय आणि प्रादेशिक. प्रात्यक्षिक प्रकल्प स्थानिक, राष्ट्रीय स्तरावरील धोरण आणि प्रादेशिक स्तरावर अनुभवाच्या आणि धड्यांच्या ज्ञानाचे हस्तांतरण.

 
रॉल्फ विड्मेर, ईएमपीए: भारत-स्वित्झर्लंड-जर्मनी ई-कचरा उपक्रम: बेंगलोरमधील अनुभव आणि मुंबईसाठी सूचना,

  • ई-कचरा एक औद्योगिक समस्या आहे, जी लोकांद्वारा सोडविली जात आहे.
  • सेको-ग्लोबल ई-वेस्ट प्रोजेक्टची थोडक्यात ओळख: 2003 मध्ये सुरु झालेले, 2008 पर्यंत चालत राहणार.
  • भारत-स्वित्झर्लंड-जर्मनी उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती: एमओईएफ आणि एएसईएम-एचएडब्ल्यूएसह
  • बेंगलोरमधील प्रकल्पाच्या आश्रयाच्या अंतर्गत उपक्रमे: आता अधिक कचरा आहे आणि भविष्यात अधिक निर्माण होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी डब्ल्यूईईई आधार-रेखा अभ्यास- जलद मुल्यांकन अभ्यास चालू आहे. ई-कचरा एजन्सी (ईडब्ल्यूए) या सुरु केलेल्या औपचारिक पुनर्चक्रीकरण एजन्सीला पूर्व-परिक्षण घेण्यासाठी केएसपीसीबीद्वारा मंजुरी मिळाली होती. अनौपचारिक क्षेत्रासह सहकारी कार्यशाळा ऑक्टोबर 05 पासून सुरु करण्याचे ठरविले आहे.
  • ईडब्ल्यूए >> अद्याप कोणती कायदेशीर चौकट नाही आहे. याची स्थापना केवळ एवढ्यासाठी झाली की आयटी उद्योगाची त्यांच्या कचऱ्याची जबाबदारीपणे विल्हेवाट लावण्यासाठी उद्योगाच्या गरजेस भागविण्यासाठी एक ऐच्छिक संस्था स्थापित करण्याची इच्छा होती. डब्ल्यूईईईमधील प्रवाहाला व्याख्यात आणि नियमित करण्यासाठी, उद्योगांशी सहकार्य करणे आणि एक सनद बनविणे.
  • मुंबईसाठी सूचना: बेंगलोरमधील वर्तमान अनुभवाचा वापर-आयातीसारखी अतिरिक्त क्षेत्रे मुंबईसाठी विशेष आहेत-ते समान उद्योग संस्था आणि जलद मुल्यांकन एकाचवेळी स्थापित करतात.
  • मार्ग: उच्च तंत्रज्ञान, निम्न तंत्रज्ञान आणि मध्यम तंत्रज्ञान

 
रजनीश सरीन, आयआरजी: मुंबईमध्ये एक जलद ई-कचरा मुल्यांकन आयोजित करणे.

  • कालक्रमानुसार इवेन्ट्स मुंबईच्या अभ्यासात सुरु केले जात आहेत
  • दिल्लीमधील अभ्यासातील निष्कर्षामध्ये ई-कचरा व्यापार शृंखला दर्शविली जात आहे.
  • राष्ट्रीय स्तरीय अभ्यास डब्ल्यूईईई निर्मिती महाराष्ट्र आणि मुंबई येथे सर्वाधिक आहे.

 
विन्नी मेहता, एमएआयटी: डब्ल्यूईईईवरील उद्योगाचा दृष्टीकोन

  • ई-कचऱ्याला एक उभरणारे मोठे आव्हान समजतो आणि निश्चितच मुंबईतील ई-कचरा उपक्रमाला समर्थन करू इच्छित आहे, आणि तो मागील 2 वर्षांपासून या प्रकरणाबाबत ईएमपीएसोबत समझोता केला आहे आणि सहयोगाच्या दिशेत आरंभिक प्रतिरोधापासून पुढे आला आहे.
  • संघटना आणि उद्योगापासून सर्व संभाव्य सहकाराची खात्री दिली.
  • आणखी समावेशासाठी आवश्यकता आणि सूचना यांच्यासाठी खुले

 
प्र&श्न आणि उत्तरे, खुली चर्चा

राकेश: अभ्यासाचे क्षेत्र पुणे देखील असावे
     
श्री देवळे/नंदूशेखर:नियमावली स्थापित करण्याअगोदर मुलभूत संरचना असणे अवश्यक आहे. बॅटरीजचे उदाहरण घ्या, नियमावली अस्तित्वात आहे, पण अंमलबजावणी करणे कठीण आहे.
     
श्री नायर: वर्तमान अधिकृत पुनर्चक्रीकरण करणाऱ्यांची ओळख ठेवावी.
     
श्री. मार्कंडेय: उत्पादकांकडून वापस घेणे अनिवार्य बनविणे.
     
डॉ. बोराळकर: स्वित्झर्लंडचे उदाहरण, जेथे एआरएफ (अॅडव्हांस्ड रिसायकलिंग फीज) ला एखादे उत्पादन खरेदी करण्यासाठी शुल्क लावले जाते, जे ई-कचऱ्याच्या योग्य पुनर्चक्रीकरणाच्या खात्रीसाठी एसडब्ल्यूआयकोला जाते.
     
श्री विन्नी मेहता:संवेदनशील वापरकर्त्यांसाठी सहयोगी प्रचार. इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी पुनर्चक्रीकरणासाठी उपभोक्तांनी देणे आवश्यक आहे.
     
डॉ. बोराळकरअधिक चांगल्या सेवांसाठी लोक पैसे देण्यास तयार आहेत. सर्वांसाठी लाभदायक स्थिती बनविण्यासाठी, लोकांना पैसे देण्यासाठी तयार करण्यासाठी, आत्मविश्वासाची बांधणी आवश्यक आहे.
     
वानखेडे:वर्तमान संग्रहण यंत्रणा कार्यक्षम आहे कारण घरातून बाहेर येणारी कोणतीही गोष्ट जमिनीतील भरावासाठी जात नाही. वर्तमान विल्हेवाट यंत्रणेची क्षमता बनवा.
     
राकेश: उत्पादकांनी पुनर्चक्रीकरणयोग्य घटक बनविले पाहिजेत, जे वस्तूंचे आयुष्यमान वाढवतील.
     
महेश: उद्योजकांसह चीनी नमुन्याच्या चांगल्या तपशिलांचा संदर्भ घ्यावा.
     
डॉ. बोराळकर:प्रस्तावासाठी पुढे जाण्यासाठी वादविवाद थांबविले: प्रत्येकाला ई-कचऱ्याच्या जलद मूल्यांकनासाठी एमपीसीबीच्या उपक्रमांना स्वीकृती देण्यासाठी आणि समर्थन करण्यासाठी विनंती केली. ई-कचऱ्यासाठी योग्य संग्रहण यंत्रणेच्या स्थापनेला सरकार आणि उद्योगाचे संपूर्ण सहाय्य असेल.
असा प्रस्ताव ठेवण्यात आला की या उपक्रमाला दिशा देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी एक तज्ञ समूह स्थापित करण्यात यावा. सुचविलेले सदस्य: एमएआयटी (एक संघटना) + 3 सदस्य, टॉक्सिक लिंक (एनजीओ), एमसीजीएम, शैक्षणिक संस्था (आयजीआयडीआर/एनईईआरआय), ईएमपीए (दिपाली), माध्यमांचे प्रतिनिधी.
     बैठकी 15 दिवसांमध्ये निश्चित करण्यात याव्यात.
     तज्ञ समूहासाठी टीओआर:  

  •   आयआरजीद्वारा प्रस्तावित अभ्यासासाठी प्रोटोकॉल अंतिम करणे
  •  स्थानिक आणि राज्य सरकारादरम्यान अभ्यास विधिविधान पुनर्चक्रण आणि संग्रहण यंत्रणेच्या आवश्याकातेस सूचित करतात.
  • पीपीपी प्रकल्प प्रस्तावासाठी (आयजीआयडीआर, सीआरआयएसआयएल आदी) विकास

     एमपीसीबी अधिकृत पुनर्चक्रण करणाऱ्यांचे मुल्यांकन करेल आणि अधिसूचित तंत्रज्ञानाच्या गरजा अद्ययावत करेल.
     संग्रहण केंद्रे आणि वापस-खरेदी-अभ्यास, महानगरपालिका कायदे, उदा. कचऱ्याला बांधणे आणि नष्ट करणे
     एमपीसीबी अधिकृत पुनर्चक्रण करणाऱ्यांचे मुल्यांकन करेल आणि अधिसूचित तंत्रज्ञानाच्या गरजा अद्ययावत करेल.
डॉ. बोराळकर: अशा प्रकल्पांसाठी एडीबी आणि डब्ल्यूबी सारख्या निधी पुरविणाऱ्या एजन्सीज तयार आहेत. अशी सुविधा उभारण्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांनी देखील रुची दाखविली आहे.  
डॉ. कटोले यांच्याद्वारा अध्यक्ष आणि वक्त्यांना धन्यवाद प्रस्तावासह या बैठकीचे समापन झाले.