Section Title

Main Content Link

उच्च न्यायालयाचे/सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश


(5) उपभोक्ता कल्याण संघटना विरुद्ध भारत सरकार आणि इतर बॉम्बे ऑर्डिनरी ओरिजिनल सिव्हील ज्युरिसडिक्शन येथील न्यायाधिकरणाच्या उच्च न्यायालयात 2005 ची (पीआयएल) रिट याचिका (लॉज) क्र. 1952 उपभोक्ता कल्याण संघटना ... याचिकाकर्ता विरुद्ध भारत सरकार आणि इतर ... प्रतिसादक
     

याचिकाकर्त्यासाठी कु. ल्युसी मेसीसह श्री राजीव चव्हाण कु. एस.व्ही. भरुचा यांच्यासह श्री. बी.ए. देसाई, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल प्रतिसादक क्र. 1 साठी कु. नवीना कुमार प्रतिसादक क्र. 2 साठी श्री अमजद सईद, सहाय्यक सरकारी वकील प्रतिसादक क्र. 3 साठी कु. प्रीती पुरंदरे प्रतिसादक क्र. 4 साठी श्रीमती साधना महाशब्दे प्रतिसादक क्र. 5 साठी कु. सोम्या श्रीकृष्णा, द्वारा मेसर्स ठाकोर जरीवाला आणि असोसिएट्सचे

     
कोरम: दलवीर भंडारी सी.जे. आणि एस.जे. वाजिफदार, जे. तारीख: 14 सप्टेंबर 2005

1.    याचिकाकर्ता, ऐच्छिक उपभोक्ता संघटनेने या विनंतीसह याचिका दाखल केली आहे की प्रतिसादक क्र. 4 ने म्हणजेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना जैव-वैद्यकीय कचऱ्याच्या (संक्षिप्त रुपात “बीएमडब्ल्यू”) उपचारासाठी मार्गदर्शक तत्त्वे बनविण्याचे निर्देश देण्यात यावे. तसेच, याचिकाकर्त्याने अशी देखील विनंती केली आहे की बृहन्मुंबईची महानगरपालिका, प्रतिसादक क्र. 3 यांना वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन आणि निपटारा यांच्या सर्वंकष नियमांचे कठोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात यावेत.
2.    अशी देखील विनंती करण्यात आली आहे, प्रतिसादक क्र. 3 ला प्रतिदिन शहरचे अपमार्जन आणि सफाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत.
3.    याचिकाकर्ताने पुढे विनंती केली आहे की प्रतिसादक क्र. 2 महाराष्ट्र राज्य, प्रतिसादक क्र. 3 बृहन्मुंबई महानगरपालिका आणि प्रतिसादक क्र. 4 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना 50 किंवा अधिक बेड्स असलेल्या सर्व इस्पितळांमध्ये/रुग्णालयांमध्ये भस्मके बसविण्याचे निर्देश देण्यात यावेत आणि ते प्रशासकीय नियंत्रणाखाली असावेत. तसेच, याचिकाकर्ताने अशी देखील विनंती केली आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वैद्यकीय कचऱ्याच्या निपटारा स्थळांचे नियमित निरीक्षण केले पाहिजे.
4.    याचिकाकर्ताने अशी देखील विनंती केली आहे की दूरदर्शनला लोकांना त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यांच्याविषयी प्रशिक्षित करण्याचे आणि नियमांचे अनुपालन न करणाऱ्या इस्पितळांविरुद्ध केलेल्या कारवाईवर कार्यक्रम दाखवावेत.
5.    सादर करत्यावेळी प्रतिसादक क्र. 2 महाराष्ट्र राज्य याला खालील विशेष प्रश्नांवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. -
     
1.    संपूर्ण महाराष्ट्रात विविध महानगरपालिका/नगर परिषदे/जिल्हा परिषदे यांच्याद्वारा किती विल्हेवाटीची स्थळे/भस्मक केंद्रे उपलब्ध करून दिलेली आहेत?
2.    सेंट जॉर्ज हॉस्पिटल – ऑटो-क्लेव्ह खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे काय?
3.    बीएमडब्ल्यू हाताळण्यासाठी जीओएमच्या इस्पितळाच्या चौथ्या श्रेणीच्या कामगारांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे?
4.    सरकारी इस्पितळे नियमित स्वरूपात बीएमडब्ल्यू सामान्य सुविधेत पाठवीत आहेत काय? संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी इस्पितळांमधील बीएमडब्ल्यूच्या हाताळणीविषयी तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास स्वास्थ्य सचिवांना निर्देश देण्यात यावेत.
5.    बीएमडब्ल्यूचे व्यवस्थापन देखील शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग बनविण्यात यावा, विशेष करून वैद्यकीय आणि रुग्णसेवेच्या अभ्यासक्रमात. महाराष्ट्र सरकारने या दिशेत पावले उचलली आहेत काय?
6.    विविध महानगरपालिकांमध्ये आणि “अ” वर्गाच्या शहरांमध्ये नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुसार बीएमडब्ल्यूच्या व्यवस्थापनाच्या सामान्य सुविधेस विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या स्वास्थ्य आणि शहरी विकास विभागाने कोणती पावले उचलली आहेत?
6.    याचिकाकर्त्याने अशी देखील विनंती केली आहे की प्रतिसादक क्र. 3, बृहन्मुंबई महानगरपालिकेस खालील विशिष्ट प्रश्नांची उत्तरे देण्याचे निर्देश देण्यात यावेत:-
     
1.    बीएमसीद्वारा सध्या किती सामाईक विल्हेवाट सुविधा/भस्मक सुविधा केंद्रे चालवली जात आहेत?
2.    बीएमसीने किती इस्पितळांशी बीएमडब्ल्यू गोळा करण्यासाठी, वाहून नेण्यासाठी आणि विल्हेवाट लावण्यासाठी करार केला आहे?
3.    निकृष्ट कामगिरी आणि उत्सर्जनाच्या नियमांचे उल्लंघन यांच्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारा बसविलेल्या भस्मकांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतीही कारवाई केली आहे काय?
4.    उक्त भस्मकांच्या विषयी वर्तमान स्थिती काय आहे?
7.    तसेच, प्रतिसादक क्र. 4, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला खालील विशिष्ट प्रश्नांची उत्तरे देण्याचे निर्देश द्यावेत अशी याचिकाकर्त्याने विनंती केली आहे:-:-
     
a.    सामाईक बीएमडब्ल्यू सुविधांसाठी सीपीसीबीद्वारा प्रकाशित मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करतात की दर 10,000 बेड्ससाठी एक भस्मक असावे आणि त्या सुविधेने 150 किमी त्रिज्येच्या सभोवतालच्या क्षेत्रास सेवा द्यावी. राज्यातील स्वतंत्र इस्पितळांमधील आणि/किंवा सामाईक सुविधांमधील भस्मकांच्या कामगिरीचे कोणतेही मुल्यांकन मंडळाने केले आहे काय? जर केले नसल्यास, ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल?
b.    ज्यांच्याकडे नियमानुसार बीएमडब्ल्यूवर अभिक्रिया करण्याची सुविधा नव्हती किंवा सामाईक सुविधेचे सदस्य बनले नाहीत, अशा बीएमडब्ल्यू जनरेटर्सच्या विरुद्ध बंद करणे आणि खटल्याच्या समवेत मंडळाने कायदेशीर कारवाई केली अशा प्रकरणांचे तपशील दिले जावेत.
c.    बहुतेक महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आणि “अ” वर्गाच्या शहरांमध्ये.
     
i.    भस्मक सुविधेत तापमान नोंदक आहे काय, आणि
ii.    कचरा एकत्रित करण्याची उचित व्यवस्था नाही काय? या परिस्थितीस सुधारण्यासाठी मंडळाने कोणती पावले उचलली आहेत?
8.    आम्ही या चौकशी व्यवस्थित वाचल्या आहेत. या चौकशा प्रकरणाच्या मुळाशी जातात, त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की प्रतिसादक क्र. 2, 3 आणि 4 यांनी याचिकाकर्त्यासाठी विद्वान समुपदेशकाच्या एका आगावू प्रतीसह दोन आठवड्यांमध्ये वर उल्लेखित चौकशींच्या संबंधात सर्वंकष प्रतिज्ञापत्र दाखल करावे. या प्रकरणी, इच्छेनुसार पुढील तारखेच्या अगोदर याचिकाकर्ता एक प्रतिटोला दाखल करू शकतो.
9.    या पी.एल.आय.ला पुन्हा 5 ऑक्टोबर 2005 रोजी पुढील निर्देशासाठी सूचित करा..


     
मुख्य न्यायमूर्ती

एस. जे. वाजिफदार, जे