महत्त्वाचे उच्च न्यायालयाचे/सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2005 चा रिट अर्ज क्र. 2565 जनहित मंच आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर
याचिकाकर्ता एक गैर-सरकारी संस्था आहे आणि त्याने ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्राकडून दापचारीकडे म्हशींच्या गोठ्यांना हटविण्यासाठी निर्देश प्राप्त करण्यासाठी प्रस्तुत याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ताने आरोप केला आहे की त्या जागेवर मोठ्या प्रमाणावर म्हशींचे गोठे आहेत, ज्यांच्यामुळे अत्यंत उपद्रव होतो, प्रदूषण होते आणि आरोग्याच्या समस्या आदी निर्माण होत आहेत आणि त्यामुळे त्यांना राज्य सरकारद्वारा ताब्यात घेतलेल्या दापचारी येथील किंवा अन्य योग्य जागेवर स्थानांतरीत करण्यात यावे.
एमपीसीबीने मुंबई नगरपालिका क्षेत्रातील 1600 म्हशींच्या गोठ्यांचे एक सर्वंकष सर्वेक्षण केले आहे आणि प्रत्येक गोठ्याच्या पर्यावरणीय स्थितीस दर्शविणारा एक तपशीलवार अहवाल सादर केला आहे. तसेच, एमपीसीबीने प्रदूषण टाळण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी निश्चित शिफारशी केल्या आहेत.
. 14 मार्च 2007 च्या आदेशान्वये, माननीय उच्च न्यायालयाने या अहवालाची नोंद घेतली आहे आणि एमपीसीबीद्वारा केल्या गेलेल्या प्रयासांची प्रशंसा केली आहे. या न्यायालयाने नगरपालिका आयुक्त आणि गुरेसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे मुख्य सचिव आणि तसेच, शहरी विभागाच्या मुख्य सचिवांना एक निर्णय घेण्यास आणि न्यायालयात 25 एप्रिल 2007 पर्यंत त्यांची प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यास सांगितले आहे.