Section Title

Main Content Link

उद्योगाची स्थापना करण्यासाठी विभागीय नकाशाचे पुस्तक ः- पर्यावरण व्यवस्थापन साधन -

भारतासारख्या देशांमध्ये औद्योगिक विकास ही एक अत्यावश्यक वाईट गोष्ट आहे. औद्योगिकीकरणाचा परिणाम म्हणून धोकादायक कचरा उत्पन्न होतो आणि त्यामुळे पर्यावरणाचे प्रदुषण उत्पन्न होते त्यामुळे पर्यावरणाला वाढता धोका उत्पन्न झालेला आहे. मानवी वस्त्या, जंगले, पाण्याच्या संस्था आणि हवा या प्रदुषणासाठी जास्त संवेदनशील असतात आणि प्रदुषणामुळे त्यांच्या श्रेणीमध्ये घट होऊ शकते. त्यामुळे या संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाचे नियोजन करणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात बाहेर सोडण्यात येणार्‍या द्रवाचे / स्त्रावाचे प्रमाण नियंत्रण करणार्‍या संस्थाकडून केले जाते आणि जेथे उद्योग सुरु करावयाचा आहे ती जागा स्वच्छ केली जाते. परंतु यामुळे उद्योग प्रदुषण निर्माण करणार नाही याबाबत खात्री देता येत नाही. तसेच प्रदुषण नियंत्रण करण्यासाठी जी साधने उद्योगांमध्ये वापरली जातात ती प्रदुषण नियंत्रण मंडळाने सुचीत केलेली असतात, अशी साधने सर्व कालावधी मध्ये त्याचे काम करु शकणार नाहीत किंवा त्यांच्या अपेक्षीत क्षमतेच्या स्तरावर काम करु शकणार नाहीत.

उद्योगामुळे पाण्याच्या प्रदुषणामुळे पाण्याच्या कोणत्या संस्थेवर परिणाम होऊ शकेल तसेच त्यातून बाहेर पडणार्‍या स्त्रावामुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होईल यावर उद्योगाची जागा अवलंबून असते.त्याचा परिणाम म्हणून निसर्गाचे संतुलन बिघडू शकते. या प्रश्नावर भविष्यामध्ये तोडगा काढण्यासाठी एम पी सी बी ने केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि जी टी झेड जर्मन टेक्नीकल को ऑपरेशन जर्मनी यांचे बरोबर, राज्यामध्ये र् र् उद्योगांच्या स्थापनेसाठी विभागीय नकाशाचे पुस्तक र् र् तयार करण्यासाठी सहकार्य करार केलेला आहे. आणि याला पर्यावरण व्यवस्थापन क्षमता बांधणी प्रकल्पा अंतर्गत जागतीक बँकेने आर्थिक सहाय्य केले आहे.

उद्योगांच्या स्थापनेसाठी विभागीय नकाशाचे पुस्तक तयार करुन वाचावयास सोपे असणारे नकाशे तयार करुन त्यामध्ये विभाग आणि जिल्ह्यातील पर्यावरणाचे वर्गीकरण आणि विविध ठिकाणांचे / जागांचे प्रदुषण होण्याची शक्यता आणि शक्य असणार्‍या पर्यायी जागा हे सर्व त्यामध्ये दाखविण्यात आले आहे.

विभागीय नकाशाचे पुस्तक
उद्योगांच्या स्थापनेसाठी विभागीय नकाशाचे पुस्तक तयार करुन वाचावयास सोपे असणारे नकाशे तयार करुन त्यामध्ये विभाग आणि जिल्ह्यातील पर्यावरणाचे वर्गीकरण आणि विविध ठिकाणांचे / जागांचे प्रदुषण होण्याची शक्यता आणि शक्य असणार्‍या पर्यायी जागा हे सर्व त्यामध्ये दाखविण्यात आले आहे.

हेतू

  • जिल्ह्यातील पर्यावरणाचे विभाग पाडणे आणि वर्गीकरण करणे.  
  • उद्योगाच्या स्थापनेसाठी ठिकाणांचा शोध घेणे आणि
  • उद्योगांच्या स्थापनेसाठी ठिकाणांचा शोध घेणे आणि शोधलेल्या ठिकाणांसाठी योग्य अशा उद्योगांचा शोध घेणे.

अत्यावश्यक

विभागीय नकाशाच्या पुस्तकात ङ्गक्त पर्यावरणाच्या दृष्टीकोनातुनच विचार केलेला आहे. उद्योग स्थापन करण्यासाठी, आर्थिक बाबी जशा की - कच्च्या मालाची उपलब्धता, अंतीम उत्पादनासाठी बाजारपेठ, पाणी पुरवठा, वीज, मजुरांची उपलब्धता इ. गोष्टी आणि पर्यावरणाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. उद्योगांच्या स्थापनेसाठी उपलब्ध असणार्‍या उत्कृष्ट आर्थिक बाबींचा विचार करुन उद्योगांसाठीच्या ठिकाणांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यानंतर जी ठिकाणे उद्योगांसाठी योग्य आहेत त्याबाबतीत उद्योग आर्थिक आणि पर्यावरण या दोन्ही बाबींचा विचार करेल. पर्यावरणाच्या बाबींचा विचार केला नाही तर थोड्या काळासाठी जास्तीत जास्त ङ्गायदा मिळू शकतो परंतु पर्यावरणाच्या बाबींचा विचार केल्यास जास्तीत जास्त मोठ्या कालावधीसाठी कमीत कमी नुकसान होते. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरणाच्या प्रमाणांमध्ये जास्तीत जास्त कडकपणा आणला जात आहे. प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी उद्योगांना प्रचंड प्रमाणात गुंतवणुक करावी लागत आहे, काही वेळा उद्योगांवर याचा प्रचंड बोजा पडत आहे व नियंत्रक करणार्‍या अधिकार्‍यांनी उद्योग बंद करावयास लावण्याचा धोका जास्तीत जास्त वाढत आहे. म्हणून पर्यावरणाचा विचार करुन त्यावर आधारित विभागीय नकाशाचे पुस्तक बनविणे हे योग्य आणि न्याय्य आहे.

उपयुक्तता

  • उत्कृष्ट ठिकाणांची तयार यादी पुरवितो आणि पर्यावरणाची संबंधीत माहिती पुरवितो.
  • निर्णय घेण्याची प्रक्रिया सोपी, जलद, खरीखुरी, पारदर्शक आणि विश्वासू बनते.
  • आपल्या देशामध्ये, जमीनीच्या प्रत्यक्ष उपयोगासाठी योजना आखण्याच्याा प्रक्रीयेमध्ये पर्यावरणाच्या बाबींचा समावेश करण्याच्या ज्या पध्दतीची कमतरता आहे, त्या पध्दतीसाठी आधार पुरविते.
  • किंमत परिणामकारक प्रदुषण नियंत्रण उपाय योजना आणि कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी मदत होते.
  • उद्योग स्थापन करण्यासाठी योग्य असे कोणते ठिकाण आहे या बाबत उद्योजकाला तयार स्वरुपात माहिती मिळते त्यामुळे उद्योजकाला माहित नसलेल्या ठिकाणावर जाऊन तेथील पर्यावरणाचे परिणामांचे मूल्याकंन करणे आणि नियंत्रण करणार्‍या संस्थांकडून क्लीअरन्स मिळाविण्यासाठी खर्च करावा लागणारा वेळ, कष्ट आणि गुंतवणुक या सर्वांची बचत होते.
  • रस्ते, पाणी पुरवठा, वीज इ. पायाभूत सोयीसुविधांच्या तसेच सामुहीक कचरा प्रक्रीया आणि विल्हेवाट लावण्याची सुविधा यांच्या विकासास मदत होते.
  • ज्या क्षेत्रांमध्ये यापूर्वीच पर्यावरणाचा जास्त ताण आलेला आहे त्या क्षेत्रांवर आणखीन जास्त ताण पडण्याला आळा बसण्यास मदत होते.
  • उद्योगा पासून होणारे प्रदुषणाची शक्यता त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीशी अनुरुप असेल याची शाश्‍वती होते.
  • ज्या उद्योगांपासून मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होण्याची शक्यता असेल अशा उद्योगांना जर मोठा धोका असणार्‍या क्षेत्रामध्ये उद्योग उभारणी करावयाची असेल तर त्यांना उत्पादनाच्या प्रक्रीयेमध्ये स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागेल याबाबत शाश्‍वती होते, कारण असे तंत्रज्ञान वापरल्यामुळे निर्माण होणार्‍या कचरा / प्रदुषण यांना अटकाव होईल आणि मिळणार्‍या पर्यावरणाशी ते अनुरुप होईल.
  • उद्योगाच्या प्रकारा बाबत आणि त्या पासून होणार्‍या अपेक्षीत प्रदुषणा बाबत लोकांमध्ये बर्‍याच आधी जनजागृती होईल.
  • सुसह्य विकास होण्यात मदत होईल.

विभागीय नकाशाचे पुस्तक - निर्णय घेण्यासाठीचे साधन

विभागीय नकाशाच्या पुस्तकामुळे - केंद्र सरकार, राज्य सरकार, उद्योग, नियंत्रण करणार्‍या सस्था आणि सर्वसाधारण लोक अशा विविध स्तरांवर, उद्योगाच्या स्थापने बाबतचा निर्णय घेण्याच्या प्रक्रीयेस मदत होते. विविध स्तरांवर घेण्यात येणारे निर्णयांचे प्रकार खाली दिले आहेत.

सरकार

1. औद्योगिक क्षेत्रांचे सूचनापत्र
2. औद्योगिक विकासाच्या प्रकाराबाबत निर्णय. उद्योगाच्या स्थापनेसाठी आर्थिक बाबींच्या विचारापेक्षा पर्यावरणाच्या बाबींचा जास्त विचार केल्यास, पर्यावरणासाठी किती खर्च करावा लागेल, त्यात किती धोका आहे आणि काय जबाबदारी आहे, या बाबत ची माहिती सरकारला होईल.
3.एखाद्या ठराविक क्षेत्रामध्ये ठरावीकच उद्योगांची वाढ होण्याला प्रतिबंध, आणि
4. काही उद्योगांच्या ठिकाणांमध्ये क्षीतीलता आणता येईल आणि त्यांना दुसर्‍या विभागात / जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी परवानगी देता येईल.

उद्योग

उद्योग स्थापन करण्यासाठी, आर्थिक बाबी जशा की - कच्च्या मालाची उपलब्धता, अंतीम उत्पादनासाठी बाजारपेठ, पाणी पुरवठा, वीज, मजुरांची उपलब्धता इ. गोष्टी आणि पर्यावरणाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. उद्योगाला जरी आर्थिक बाबींच्या दृष्टिीकोनातून उत्कृष्ट योग्य ठिकाणांची माहिती असली तरी त्यांना पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीकोनातून माहिती असू शकणार नाही

विभागीय नकाशाच्या पुस्तकामुळे उद्योजकांना राज्यातील विविध जिल्ह्यातील योग्य ठिकाणां बाबत माहिती मिळू शकेल आणि त्या ठिकाणां मध्ये उद्योग सुरु करणे व्यवहार्य आहे किंवा आर्थिक दृष्टया शक्य आहे किंवा नाही याबाबत माहिती मिळते. आणि त्यानुसार निर्णय घेता येतो.


नियामक अधिकारी

एखाद्या उद्योगाची एखाद्या विशिष्ट जागेवरील युक्तता यावर पर्यावरणवादी आकारणी करण्यात ङ्गार वेळ न घालवता निर्णय घेणे.


जागेच्या सर्वसाधारण मूल्यांसंबंधी जाहीर सूचना

सामाईक प्रदूषण प्रक्रिया आणि विल्हेवाट सुविधा यांची तरतूद.


प्रदूषण देखरेख व नियंत्रण कार्यक्रम यांचे अगोदरच व्यवस्थित नियोजन आणि,

पर्यावरणावादी नियमांच्या पूर्ततेसाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय / क्षेत्रीय कार्यालयामध्ये आवश्यक असलेले मनुष्यबळ, देखरेख यंत्रणा, प्रयोगशाळा सुविधा, अंदाजपत्रक इ. बाबत अगोदरच नियोजन करणे.


जनता

प्रादेशिक नकाशांच्या पुस्तकांद्वारे जनतेला त्यांच्याजवळील क्षेत्रात नव्याने होऊ घातलेल्या उद्योगांचे स्थान तसेच त्याद्वारे होणारे प्रदूषण याबाबतची माहिती मिळेल. जनता असा उद्योग प्रत्यक्षात सुरु होण्यापूर्वी ही सुधारणा अनुरुप आहे की नाही हे ठरवू शकते. ह्याद्वारे त्यांचेवर बळजबरीने प्रदूषण लादण्याची भिती नष्ट केली जाते.


प्रादेशिक नकाशांचे पुस्तक तयार करण्याच्या पद्धतीचे शास्त्र

औद्योगिक संस्था पाहण्यासाठी प्रादेशिक विभाग हे जी.आय.एस. *** वापरुन बनविण्यात येतात ज्यामध्ये विषयासंबंधी नकाशांचे एकमेकांवर थर बनविण्यात येतात आणि पर्यावरणवादी संवेदनशीलतेचे विविध नियमांतर्गत औद्योगिक प्रयोजनासाठी अनुपयुक्त असलेल्या जागा वगळण्याची पध्दत अवलंबली जाते. ह्या पद्धतीच्या शास्त्रामध्ये जिल्ह्याच्या स्वाभाविक वैशिष्ट्यांची ओळख, न्यायिक प्रतिबंधामुळे उद्योगांच्या उभारणीसाठी अनुपयुक्त ठरविलेल्या संवेदनशील प्रभागांचे मापन, भौतिक दडपणे, सामाजिक पीरशिलन आदी बाबींचा अंतर्भाव करण्यात येतो, ज्याद्वारे जिल्ह्यातील हवा/पाणी यांतील संभवनीय प्रदूषणाचे मानक ठरविता येते आणि विविध संभवनीय प्रदूषणास अनुरुप होऊ शकतील अशा पर्यायी जागा शोधता येतात. ही अनुरुपता संपूर्णपणे पर्यावरणवादी तत्वांवर पायाभूत आहे. असे विविध नकाशे बनविण्यासाठी १: २,५०,००० हे प्रमाण वापरण्यात येते (१सेंमी = २.५ किमी.) एखाद्या जिल्ह्याचे प्रादेशिक नकाशांचे पुस्तक बनविण्याची प्रक्रिया ही सहा टप्प्यांमध्ये विभागलेली आहे, ते खालीलप्रमाणे:

1.जिल्ह्याचा पायाभूत नकाशा बनविणे
2.जिल्ह्याचे भौगोलिक विशेष दाखविणार्‍या विषयांची रचना करणे (जमिनीचा वापर व ड्रेनेज नकाशे, भुपृष्ठाची रचना, जमिनीची कार्यक्षमता इत्यादी.)
3.‘संवेदनशील विभाग’ असलेल्या अशा जागांची ओळख पटविणे ज्या जागा पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने / मार्गदर्शक तत्वांमुळे, न्यायिक प्रतिबंधांमुळे, सामाजिक दडपणामुळे आणि भौतिक दडपणांमुळे उद्योगांच्या उभारणीसाठी अनुरुप नाहीत.
4.हवा प्रदूषणाबाबत संवेदनशीलता आणि भूजल प्रदूषण संवेदनशीलता याच्याशी संबंधीत नकाशांची रचना करणे.
5.विविध विषयांच्या नकाशांच्या एकत्रीकरणावर पायाभूत असलेल्या व जागेची हवा आणि पाणी प्रदूषणाबाबत संवेदनशीलता आणि *औद्योगिक उभारणीचे धोके यावर आधारीत उद्योगांच्या उभारणीसाठी योग्य अशा पर्यायी जागांची ओळख पटविणारा आणि **भूजल प्रदूषण संवेदनशीलतेवर आधारीत घनकचरा व्यवस्था करण्यासाठीच्या शक्य असलेल्या जागा दर्शविणारा नकाशा तयार करणे.
6. शोधलेल्या विविध जागांसाठी अनुरुप अशा उद्योगांची आणि औद्योगिक संस्था उभारणीसाठीच्या मार्गदर्शक तत्वांची आणि त्यासाठी निश्‍चित केलेल्या प्रक्रियांची यादी तयार करणे.