Section Title

Main Content Link

औष्णिक वीजकेंद्रातून उत्सर्जित राख - उडत्या राखेचा वापर

औष्णिक वीजकेंद्रातून उत्सर्जित राख

नवी दिल्ली येथे दिल्लीच्या उच्च न्यायालयात सीडब्ल्यू 2145/1999

जनहित याचिकेसाठी केंद्र           ---              याचिका   

विरुद्ध

भारत सरकार आणि अन्य                          ---              प्रतिसादक

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्रतिज्ञापत्र

मी, दिलीप भास्करराव बोराळकर, वयवर्षे 51, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सचिव, ज्याचे कार्यालय कल्पतरू पॉइंट, सायन (पू), मुंबई: 400 022 येथे प्रतिज्ञापूर्वक कथन करतो की:

  1. मी 5 ऑगस्ट 2004 तारखेस माननीय न्यायालयाद्वारा पारित आदेशातील आशय वाचलेला आहे, ज्यात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला जे वीटभट्टी उत्पादक मातीबरोबर राख मिसळत नाहीत, त्यांना कामास अनुमति दिली जाणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे. मी असे सांगतो, की 14 सप्टेंबर 1999 आणि 27 ऑगस्ट 2003 तारखेच्या अधिसूचनेच्या तरतुदींच्या अनुसार, मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये उक्त अधिसूचनेच्या तरतुदींचे अनुपालन न करणाऱ्या क्षेत्रातील वीटभट्टी उत्पादकांची ओळख काढली आहे. मी असे सादर करतो की मंडळाकडे असलेल्या माहिती आणि नोंदीच्या अनुसार, काम करीत असलेल्या वीट भत्त्यांची संख्या 4663 आहे, ज्यांच्यापैकी 3874 विटा बनविताना मातीत उडती राख मिसळत नाहीत. प्रांतानुसार माहिती जोडपत्र-I मध्ये देण्यात आली आहे.
  2. मी असे सांगतो की, मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी या प्रकरणास संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे नेले आहे, ज्यांच्याकडे कायद्याच्या अंतर्गत वीट भट्टी मालकांना त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये मातीचे खनन करण्यासाठी खनन लीज/परवाना देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांना अशा वीटभट्टी मालकांचे लीज/परवाने रद्द करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, जे विटा बनविताना मातीत उडती राख मिसळत नाहीत. तथापि, असे सादर करतो की, या संदर्भात जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून मंडळाला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. हे मंडळ जिल्हा प्रशासनासोबत या प्रकरणाबाबत पाठपुरावा करत आहे.
  3. मी असे सादर करतो की मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 मधील तरतुदींच्या अंतर्गत आणि या माननीय न्यायालयाच्या आदेशांचे अनुपालन न करणाऱ्या राज्यातील वीटभट्ट्यांना बंद करण्याचे निर्देश जारी करीत आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा या निर्देशांच्या अनुपालनाची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि तसेच या प्रकरणाच्या गांभीर्याबाबत कळविले आहे. मी असे सादर करतो, की हे मंडल या माननीय न्यायालयाच्या आदेशांच्या अनुपालनाच्या खात्रीसाठी त्याच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांद्वारा पाठपुरावा करीत आहे. मी आणखी हे सांगू इच्छितो की 14 सप्टेंबर 1999 आणि 27 ऑगस्ट 2003 तारखेच्या अधिसूचनेच्या तरतुदींच्या अनुसार 14 सप्टेंबर 1999 आणि 27 ऑगस्ट 2003 तारखेच्या उडत्या राखेच्या अधिसूचनेच्या तरतुदींचे अधिकाधिक वीटभट्टी मालक पालन करतील यासाठी मंडल पूर्ण प्रयत्न करीत आहे. September, 1999 and 27th August, 2003 issued under the Environment (Protection) Act, 1986.
  4. या विषयाबाबत आदरासाहित सादर करतो की या मंडळाचे गठन आरंभी जल (प्रतिबंधवप्रदूषणनियंत्रण) अधिनियम, 1974 च्या तरतुदींच्या अंतर्गत केले होते. तथापि, मागील तीन दशकांमध्ये मंडळाची कार्ये, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या अनेक पटीने वाढल्या आहेत. मंडळाला अनेक पर्यावरणीय विधिविधाने आणि त्याच्या अंतर्गत बनविलेले नियम यांची अंमलबजावणी करावयाची असते. ज्यात घातक कचऱ्याचे व्यवस्थापन, जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, नागरी घन कचरा व्यवस्थापन, घातक रसायने नियम, बॅटरी नियम, पातळ प्लास्टिक पिशव्यांचे नियमन, सीआरझेड अधिसूचना, पर्यावरणीय प्रभाव मुल्यांकन अधिसूचना, आणि त्याशिवाय भारतीय माननीय उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या विविध आदेशांचे अनुपालन सामील आहे. मी असे सादर करतो, की या मंडळाकडे असलेले मनुष्यबळ आणि मुलभूत संरचना वाढलेल्या जबाबदाऱ्यांच्या प्रमाणात नाही आहेत. वर सांगितल्याप्रमाणे, वेळेवर कारवाई करण्यास काही वेळा विलंब होत असतो.
  5. मी असे सादर करतो, की मंडळाने अगोदरच मुलभूत संरचना आणि मनुष्यबळाच्या अनुसार संस्थागत मजबुतीकरणाच्या प्रक्रियेस आरंभ केला आहे, ज्यात मंडळाच्या उपक्रमाचे संगणकीकरण देखील समाविष्ट आहे. हे घातक कचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात डब्ल्यूपी (सी) 657 / 1995 च्या प्रकरणातील माननीय भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने आहे.
  6. मी सादर करतो की, कसूरदार वीटभट्ट्यांना बंद करण्याच्या कारवाई व्यतिरिक्त, हे मंडळ विभिन्न भागधारकांना प्रशिक्षित करण्याच्या प्रक्रियेस आणि राज्यातील औष्णिक वीज केंद्रांच्या सहकाऱ्यासह अधिकाधिक उडत्या राखेचे महत्त्व कळविण्यास आरंभ करेल. मी सादर करतो की, या अधिसूचनेच्या अंमलबजावणीत सर्वात मोठी समस्या म्हणजे उडत्या राखेची औष्णिक वीज केंद्रांमधून अंतिम वापरकर्त्यांपर्यंत, म्हणजेच वीटभट्ट्यांपर्यंत वाहतूक करणे हे आहे. लहान आणि मध्यम आकाराच्या वीट भट्ट्या उडत्या राखेच्या वाहतुकीच्या आणि त्याला चढविण्याच्या आणि उतरविण्याच्या खर्चाचे वाहन करू शकत नाहीत. या गोष्टीस एमओईएफने विचारात घेणे गरजेचे आहे.
  7. मी पुन्हा सांगतो की उडत्या राखेच्या वापरावरील पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकारद्वारा जारी अधिसूचनेच्या तरतुदींचे आणि या माननीय न्यायालयाच्या आदेशांचे अनुपालन करण्याचा हे मंडळ पूर्ण प्रयत्न करेल.

मुंबई येथे 24 सप्टेंबर 2004 रोजी प्रतिज्ञापूर्वक कथन केले..

अभिसाक्षी
(दिलीप भास्करराव बोराळकर)
सदस्य सचिव

माझ्याद्वारा ओळख पटली
(ए. बी. जैन)

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासाठी वकील .

 

 

NAME OF REGION :- KALYAN
Industries Established on of before Decemeber 31, 1991

क्षेत्राचे नाव – कल्याण
31 डिसेंबर 1991 रोजी किंवा अगोदर स्थापित उद्योग
 
 
जिल्हा District क्षेत्र
एकूण वीट उत्पादक
उडती राख वापरणारे वीट उत्पादक उडती राख न वापरणारे वीट उत्पादक लीज रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केलेल्या वीट उत्पादकांची संख्या लीज/परवाने रद्द केलेल्यांची संख्या शेरा
कल्याण आणि ठाणे ठाणे 996 33 963 963 --  
औरंगाबाद परभणी 265 0 265 265 --  
  बीड 280 29 251 251    
  उस्मानाबाद 52 0 52 52 --  
  नांदेड 16 0 16 16 --  
  लातूर 118 5 113 113 --  
नागपूर नागपूर 133 0 133 133 --  
  वर्धा 257 160 97 97 --  
  भंडारा 360 0 360 360 --  
  चंद्रपूर 141 83 58 58 --  
अमरावती अमरावती 23 23 0 0 --  
  अकोला 195 195 0 0 --  
  बुलढाणा 182 182 0 0 --  
नाशिक नाशिक 410 31 379 379 --  
  जळगाव 517 25 492 492 --  
  अहमदनगर 323 23 300 300 --  
रायगड आणि रायगड 395 0 395 395 --  
नवी मुंबई              
एकूण   4,663 789 3,874 3,874 --