Section Title

Main Content Link

उद्योग आस्थापनेसाठी संमती पत्र प्रक्रिया :

  • अर्जदार संकेत स्थळावर प्रथम नोंदणी करेल http://www.ecmpcb.in/
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्जदाराने एक-वेळची मोबाइल पडताळणी प्रक्रिया आणि एकवेळ ऑनलाइन कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी.
  • नोंदणीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर.
  • अर्जदार ऑनलाईनवर अर्ज सादर करेल. त्यानंतर "दस्तावेज प्रलंबित "हा सन्देश दिसेल,४ आवश्यक दस्तावेज ऑनलाईनवर सादर करणे गरजेचे आहे. त्यानंतर "शुल्क प्रलंबित "असा संदेश दिसेल. उद्योगानी शुल्क संरचनेप्रमाणे ऑनलाईन http://www.mpcb.gov.in/consentmgt/waterairact.php#fees. शुल्क भरावे. उद्योगानी शुल्क विवरण अद्ययावत करावे ,अर्जाच्या संमती नंतर "शुल्क संमत"असा बदल होईल
  • उप-प्रादेशिक अधिकारी,क्षेत्र अधिकाऱ्यास अर्ज देईल. क्षेत्र अधिकारी अर्जाची छाननी करून "एकात्मिक माहिती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत" सादर करेल. अर्जाची स्थिती "प्रक्रियेत" अशी दिसेल. क्षेत्र अधिकारी अर्जाची छाननी करेल व उद्योगास भेट देईल(उद्योग आस्थापनेसाठी व प्रथम कार्यरत करण्यासाठी) तसेच शिफारस/भेटीचा अहवाल उप-प्रादेशिक अधिकाऱ्यास सादर करेल. उद्योगाचा संवर्ग व भांडवली गुंतवणुकीनुसार प्रदत्त अधिकाराप्रमाणे
  • http://www.mpcb.gov.in/consentmgt/waterairact.php अर्ज "एकात्मिक माहिती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत" सादर करण्यात येईल.
  • संबंधित प्राधिकारी अर्जाची छाननी करेल. अर्ज जर योग्यरीतीने सादर केला असेल तर "एकात्मिक माहिती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत" अर्जास संमती दिली जाईल व ऑनलाईन प्रणालीमध्ये "संमत" असे दर्शविले जाईल व स्वाक्षरीसहित संमतीपत्राची प्रत उपलब्ध केली जाईल अन्यथा अर्ज अयोग्य असेल तर तो अर्ज यंत्रणेमार्फत नाकारला जाईल व अर्जाची स्थिती "नाकारण्यात आला" अशी दिसेल. उद्योग,संमतीपत्राची प्रत पोर्टलवरून प्राप्त करू शकेल.

उद्योग कार्यरत करण्यासाठी संमतीपत्र प्रक्रिया

  • नोंदणीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदार ऑनलाईनवर अर्ज सादर करू शकेल
  • त्यानंतर "दस्तावेज प्रलंबित "हा सन्देश दिसेल,४ आवश्यक दस्तावेज ऑनलाईनवर सादर करणे गरजेचे आहे. त्यानंतर "शुल्क प्रलंबित "असा संदेश दिसेल. उद्योगानी शुल्क संरचनेप्रमाणे http://www.mpcb.gov.in/consentmgt/waterairact.php#fees. ऑनलाईन शुल्क भरावे. उद्योगानी शुल्क विवरण अद्ययावत करावे व अर्जाच्या संमती नंतर "शुल्क संमत"असा बदल होईल.