उद्योगांचेस्थान - मुंबईमहानगरक्षेत्र
अ) उद्योगांच्यास्थानांवरप्रतिबंध
मुंबई महानगर क्षेत्र, महाराष्ट्र सरकार, उद्योग, उर्जा व श्रम विभाग यांनी शासन निर्णय क्र.आयएलपी / 1098 / 4789 / आयएनडी - 2 दिनांक 7/ 11 / 1998 द्वारे मुंबई महानगर क्षेत्रातील औद्योगीक स्थान नीति मध्ये करण्यात आलेले फेरबदल अधिसूचित केले आहेत. तदनुसार, औद्योगीक स्थानांच्या सुधारीत नितीच्या उद्देश्यासाठी मुंबई महानगर क्षेत्राचे खालील प्रमाणे विभाग करण्यात आले आहेत.
विभाग1:- बृह्नमुंबई व ठाणे महापालिका तसेच मिरा-भाईंदर नगर पालिकांचा समावेश केला आहे.
विभाग2:- कल्याण व नवी मुंबई महानगर पालिका, उल्हासनगर, अंबरनाथ, कुळगांव-बदलापुर नगर पालिका, अनुसूची 3 मध्ये दर्शविल्याप्रमाणे भिवंडी व उरण उप क्षेत्र तसेच अधिसूचना क्र.टीपीएस 1287 /27532 / सीआर - 228-81 / युडी - 12, दिनांक 14 मे, 1990 ( अनुसूची 4 ) अनुसार वसई-विरार उप क्षेत्र यांचा समावेश आहे.
विभाग3:- वरील विभाग 1 व 2 वगळता, मुंबई महानगर क्षेत्रातील राहिलेले इतर सर्व विभाग.
मुंबई महानगरक्षेत्रातीलस्थानियप्रतिबंधखालीलप्रमाणेआहेत:
क्षेत्राचे नांव- कल्याण
31 डिसेंबर 1991 रोजी किंवा त्यापूर्वी स्थापन झालेले उद्योग
प्रकरण
|
विभाग 1
|
विभाग 2
|
---|---|---|
नवे घटक, दुसरीकडे स्थापन केलेल्या किंवा बंद केलेल्या घटकाच्या बदल्यातील घटक | अ) अनुसूची 1 उद्योगासाठी मुक्तपणे अनुमति दिली जाईल. | अ) अनुसूची 2 मधील घटकांच्या ऐवजी मुक्तपणे अनुमति दिली जाईल. |
ब) या शासन निर्णयाच्या परिच्छेद 7 मध्ये दिलेल्या अटींच्या अधिन ठाणे महापालिका क्षेत्र व मिरा भाईंदर नगर परिषद क्षेत्रातील उद्योगांना अनुसूची -1 ए प्रमाणे अनुमति दिली जाईल. | ब) केवळ एमआयडीसी क्षेत्रातील अनुसूची 2 मधील उद्योगांना अनुमति दिली जाईल. या शासन निर्णयाच्या परिच्छेद 9 अंतर्गत दिलेल्या समितीच्या अनुमति नंतर परवानगी दिली जाईल. | |
(क) इतरांना परवानगी दिली जाणार नाही. | (क) उरण उप क्षेत्रामध्ये अनुसूची 3 मध्ये दर्शविल्याप्रमाणे कोणत्याही नविन / बदलीच्या घटकाला परवानगी दिली जाणार नाही. | |
2. विस्तारीकरण, फेरबदल किंवा वर्तमान घटकाचे रुपांतरण
|
(अ) अनुसूची 1 मधील उद्योगांना परवानगी दिली जाईल. | (अ)अनुसूची 2 मधील उद्योगांशिवाय विस्तारीकरण आदीना परवानगी दिली जाईल. |
ब) या शासन निर्णयाच्या परिच्छेद 7 मध्ये दिलेल्या अटींच्या अधिन ठाणे महापालिका क्षेत्र व मिरा भाईंदर नगर परिषद क्षेत्रातील उद्योगांना अनुसूची - 1 ए प्रमाणे अनुमति दिली जाईल. | ब) केवळ एमआयडीसी क्षेत्रातील अनुसूची 2 मधील उद्योगांना अनुमति दिली जाईल. या शासन निर्णयाच्या परिच्छेद 9 अंतर्गत दिलेल्या समितीच्या अनुमति नंतर परवानगी दिली जाईल. | |
क) अतिरिक्त वीजेची आवश्यकता नसलेल्या व अतिरिक्त बांधकाम क्षेत्र नसलेल्या कारखान्यांना प्रदूषणाचा स्त्रोत संपूर्णतपणे कमी करण्याच्या अटीवर अनुसूची 2 मधील उद्योगांना परवानगी दिली जाईल. | ||
ड) अनुसूची 1, 1ए व 2 मध्ये समाविष्ट नसलेल्या घटकांना एफएसआय मान्यतेनुसार, 4 /5 / 93 रोजी अतिरिक्त विजेचा अधिकृत जोडणी भार 25 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या अटीं वर परवानगी दिली जाईल. | ||
3. खुल्या जागेवर प्रस्तावित औद्योगीक वसाहतीचे बांधकाम | अ) गृहनिर्माण साठी अनुसूची 1 उद्योगांसाठी परवानगी दिली जाईल. | अ) गृहनिर्माण साठी अनुसूची 2 व्यतिरिक्त उद्योगांना परवानगी दिली जाईल. |
ब) या शासन निर्णयाच्या परिच्छेद 7 मध्ये दिलेल्या अटींच्या अधिन ठाणे महापालिका क्षेत्र व मिरा भाईंदर नगर परिषद क्षेत्रातील उद्योगांना अनुसूची - 1 ए प्रमाणे परवानगी दिली जाईल. | ब) एमआयडीसी क्षेत्रातील गृहनिर्माण साठी अनुसूची 2 मधील उद्योगांना परवानगी दिली जाईल. | |
क) वरील (अ) व (ब) व्यतिरिक्त गृहनिर्माणासाठी परवानगी दिली जाणार नाही. | ||
4. मान्यता प्राप्त औद्योगीक वसाहती/विभागाच्या गाळ्यांचे विस्तारीकरण (अंतिम ना हरकत प्रमाणपत्र असलेल्या) | अ) या शासन निर्णयाच्या परिच्छेद 7 मध्ये दिलेल्या अटींच्या अधिन ठाणे महापालिका क्षेत्र व मिरा भाईंदर नगर परिषद क्षेत्रातील उद्योगांना अनुसूची - 1 ए प्रमाणे गृहनिर्माणास परवानगी दिली जाईल. | अ) अनुसूची 2 च्या उद्योगा अतिरिक्त गृहनिर्माणासाठी परवानगी दिली जाईल. |
ब) एमआयडीसी क्षेत्रामध्ये विस्तारीकरण / विभागासाठी परवानगी दिली जाईल, गृहनिर्माण अनुसूची 2 मधील उद्योगासाठी सुद्धा. |