Section Title

Main Content Link

औद्योगीक स्थाने - डहाणू क्षेत्र

औद्योगीक स्थाने

डहाणू तालुक्यातील प्रतिबंध

पर्यावरण व वने मंत्रालय, भारत सरकार यांनी दिनांक 20/6/91 रोजी अधिसूचने द्वारे पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्र म्हणून डहाणू तालुका घोषित केला आहे व उद्योग स्थापन करण्यासाठी काही प्रतिबंध लावले आहेत. डहाणू तालुक्यामध्ये अशा औद्योगीक गतिविधींवर परवानगी/प्रतिबंध लावण्याच्या उद्देश्याने हिरव्या, नारिंगी व लाल अशा तीन श्रेणी मध्ये उद्योगांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. केवळ हिरव्या श्रेणी मधील उद्योगांना मान्यता प्राप्त औद्योगीक क्षेत्रामध्ये उद्योग स्थापन करण्याची अनुमति खालील अटींवर दिलेली आहे:

  1. जे उद्योग नॉन-ऑब्नोक्सीयस व नॉन हझार्डस आहेत केवळ अशा उद्योगांनाच परवानगी दिली जाईल.
  2. जे उद्योग औद्योगीक धुर सोडत नाहीत व नैसर्गीक वातावरण प्रदूषित करीत नाहीत अशा उद्योगांना परवानगी दिली जाईल.
  3. असे उद्योग जे आपल्या निर्माण प्रक्रिये मध्ये कोळशाचा वापर करीत नाहीत, त्यांना परवानगी दिली जाईल.
  4. केवळ असे उद्योग जे धुर किंवा धुळी सारखे घटक वातावरणात सोडत नाहीत, त्यांना परवानगी दिली जाईल.

डहाणू तालुका सूचना