औद्योगीक स्थाने - डहाणू क्षेत्र
औद्योगीक स्थाने
डहाणू तालुक्यातील प्रतिबंध
पर्यावरण व वने मंत्रालय, भारत सरकार यांनी दिनांक 20/6/91 रोजी अधिसूचने द्वारे पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्र म्हणून डहाणू तालुका घोषित केला आहे व उद्योग स्थापन करण्यासाठी काही प्रतिबंध लावले आहेत. डहाणू तालुक्यामध्ये अशा औद्योगीक गतिविधींवर परवानगी/प्रतिबंध लावण्याच्या उद्देश्याने हिरव्या, नारिंगी व लाल अशा तीन श्रेणी मध्ये उद्योगांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. केवळ हिरव्या श्रेणी मधील उद्योगांना मान्यता प्राप्त औद्योगीक क्षेत्रामध्ये उद्योग स्थापन करण्याची अनुमति खालील अटींवर दिलेली आहे:
- जे उद्योग नॉन-ऑब्नोक्सीयस व नॉन हझार्डस आहेत केवळ अशा उद्योगांनाच परवानगी दिली जाईल.
- जे उद्योग औद्योगीक धुर सोडत नाहीत व नैसर्गीक वातावरण प्रदूषित करीत नाहीत अशा उद्योगांना परवानगी दिली जाईल.
- असे उद्योग जे आपल्या निर्माण प्रक्रिये मध्ये कोळशाचा वापर करीत नाहीत, त्यांना परवानगी दिली जाईल.
- केवळ असे उद्योग जे धुर किंवा धुळी सारखे घटक वातावरणात सोडत नाहीत, त्यांना परवानगी दिली जाईल.