महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना
महाराष्ट्र जल प्रदूषण प्रतिबंध अधिनियम, १९६९, च्या तरतुदीनुसार ७ सप्टेंबर १९७० रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली. केन्द्रीय विधिविधान असलेल्या जल (पीएन्डसीपी) अधिनियम १९७४ च्या कलम ४ च्या तरतुदींनुसार दिनांक १.६.१९८१ रोजी महाराष्ट्रामध्ये जल (पीएन्डसीपी) अधिनियम १९७४ लागू करण्यात आला आणि तदनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले. हवा (पीएन्डसीपी) अधिनियम १९८१ महाराष्ट्रामध्ये १९८३ मध्ये लागू करण्यात आला आणि प्रारंभी काही क्षेत्र हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून दिनांक २.५.१९८३ रोजी घोषित करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्र राज्य दिनांक ६.११.१९९६ पासून हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. हवा (पीएन्डसीपी) अधिनियम १९८१ च्या कलम ५ अनुसार हे मंडळ राज्य मंडळ म्हणून कार्यरत आहे.
जल (पीएन्डसीपी) अधिनियम १९७४ च्या कलम ४ व हवा (पीएन्डसीपी) अधिनियम १९८१ च्या कलम ५ च्या तरतुदीमध्ये सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष, सदस्य सचिव तसेच शासकीय व अ-शासकीय सदस्यांचा मंडळामध्ये समावेश आहे.